Premium|Gen Z Relationships and Financial Habits : जेन झीची बदलती नाती आणि पैशांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन

Gen Z Relationships and Financial Habits : स्मार्टफोनच्या जगात वाढलेली जेन झी नात्यांमध्ये स्वातंत्र्य, तर आर्थिक व्यवहारांत लवचीकता आणि सुरक्षितता शोधते. बदलत्या जीवनशैलीचा त्यांच्या खर्च, बचत आणि गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो?
Gen Z Relationships and Financial Habits

Gen Z Relationships and Financial Habits

esakal

Updated on: 

नेहा लिमये - nehaalimaye@gmail.com

जन्मापासून स्मार्टफोनच्या स्क्रीनसोबत वाढलेली ‘जेन झी’ची पिढी नात्यांकडे ज्या नजरेने पाहते, त्याच नजरेने पैशांकडेही पाहते. नात्यात ‘कमिटमेंट’पेक्षा ‘स्पेस’ आणि आर्थिक व्यवहारात ठरावीक चौकटीपेक्षा लवचीकता, डिजिटल सुविधा आणि स्वतःची आर्थिक सुरक्षितता यांना ती प्राधान्य देते. ‘सिच्युएशनशिप’, ‘स्लो डेटिंग’, ‘घोस्टिंग’ किंवा ‘बेंचिंग’सारख्या नव्या नातेसंबंधांच्या संकल्पनांचा परिणाम त्यांच्या खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींवरही दिसतो. त्यामुळे ‘जेन झी’चा अर्थवेध घेताना त्यांच्या नात्यांची बदलती भाषा आणि पैशांशी असलेलं त्यांचं नातं समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.

सध्या सगळीकडे ‘जेन झी’चा बोलबाला आहे. प्रस्थापित व्यवस्थेला सतत प्रश्न विचारणं असो, वागण्या-बोलण्यातला मोकळेपणा असो किंवा करिअर-नात्यांच्या बाबतीतली स्पष्ट भूमिका असो, ही पिढी आधीच्या मिलेनियल किंवा जेन एक्सपेक्षा वेगळी आहे, हे प्रकर्षाने जाणवतं. ‘कुठल्याही घालून दिलेल्या रेषेवर आम्ही का चालायचं? कुणीतरी सांगतं आहे म्हणून का करायचं? तुम्ही आयुष्यभर एकच काम करत राहिलात, त्याच जोडीदाराबरोबर राहिलात म्हणून आम्ही का राहायचं? तुम्ही तरी कुठे सुखी झालात? ताण आहेच ना; मग आम्ही तेच करत का जगायचं?’ असे प्रश्न सडेतोडपणे विचारणं एवढ्यावरच हे थांबत नाही. ‘आमचे प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, तुमच्या नाही,’ असा ठामपणाही ही पिढी दाखवते. त्यामुळे आधीच्या पिढ्यांना ‘जेन झी’ काहीशी जड जाते; पण जरा खोलात जाऊन विचार केला, तर ही पिढी अशी का आहे, याची उत्तरं त्यांच्या जडणघडणीत आणि भवतालातच सापडतात. एकतर, ‘जेन झी’ ही जन्मापासून स्मार्टफोन हातात घेऊन वाढलेली पहिली पिढी आहे. त्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि आर्थिक जीवन मोबाइलच्या स्क्रीनभोवतीच फिरतं. दुसरं म्हणजे, आधीच्या पिढ्यांनी ‘आम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला आम्ही देणारच’ असं म्हणत ‘जेन झी’ला वाढवलं. त्यामुळे त्यांच्यासाठी आयुष्याची लढाई ‘अस्तित्वाची’ कधीच नव्हती; तर ‘संपन्नतेच्या प्रश्नांची’ (प्रॉब्लेम ऑफ ॲबॅण्डन्स) होती. त्यात कोविडची महासाथ, आयटी क्षेत्रातील मंदी, ‘एआय’चा झपाट्याने वाढलेला वापर, जागतिक युद्धप्रसंग, भू-राजकीय अस्थिरता आणि नोकऱ्यांची अनिश्चितता या सगळ्या गोष्टी ‘जेन झी’ने अगदी जवळून पाहिल्या आहेत. या पिढीच्या आयुष्याचा मूलमंत्रच ‘कसलीही शाश्वती नसणं हीच शाश्वती आहे,’ असा आहे. त्यामुळे ते कोणावरही आंधळा विश्वास ठेवत नाहीत. धोका किंवा फसवणूक टाळण्यासाठी ते नात्यात, करिअरमध्ये आणि आर्थिक बाबतीतही खूप सावधपणे पावलं टाकतात. साहजिकच, याचं प्रतिबिंब अगदी तरुण वयापासून त्यांच्या नातेसंबंधांत आणि आर्थिक सवयींतही दिसतं.

Loading content, please wait...