

India's Geopolitical Great Game: The Battle for the Indian Ocean
E sakal
How India Is Challenging China's Influence in the Indian Ocean
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे हिंदी महासागरात सामरिक लष्करी तळ आहेत. अमेरिका, फ्रान्स, यूएई, तुर्कीये आणि रशिया या प्रदेशातल्या अनेक देशांना लष्करी साहित्य पुरवतात. फ्रान्सच्या ताब्यात या महासागरातली सर्वांत जास्त बेटं आहेत. ‘यूएई’ चे या महासागरातल्या जवळपास प्रत्येक देशाशी आर्थिक आणि सामरिक करार आहेत. हिंदी महासागरात इतक्या देशांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने येथल्या वर्चस्वाची लढाई अमेरिका-चीन किंवा चीन-भारत अशा दोन देशांमधील नसून तिला जागतिक परिमाण आहे.
कधीकधी अनपेक्षितपणे घडणाऱ्या भेटी भविष्य बदलतात. १४९८ च्या जानेवारीत मालिंदीच्या बंदरात एक पोर्तुगीज माणूस भारताकडे जायचा मार्ग सापडत नाही, या काळजीत होता. अनपेक्षितपणे त्याला तो मार्ग दाखवणारा अनुभवी खलाशी भेटला.