Global Innovation Index 2026
Esakal
पुणे – एखाद्या संशोधनाचा प्रवास कसा असतो, तर एखादा संशोधक प्रयोगशाळेत नवे तंत्रज्ञान विकसित करतो, त्याला पेटंट मिळते आणि त्या शोधाची सायन्स जर्नलमध्ये नोंद होते. पण या पलिकडे जाऊन सर्वात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे या व्यावहारिक जगात उपयोग झाला की नाही? संशोधनावर आधारित उत्पादन बाजारात आले की नाही? या संशोधनाने एखादी सामाजिक समस्या सोडवता आली की नाही? आणि जर असे काहीच झाले नाही तर त्याला नवसंशोधन म्हणायचे का? असे प्रश्न त्या अनुषंगाने निर्माण होतात.
जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजे World Intellectual Property Organization ने २९ सप्टेंबर रोजी स्वित्झर्लंड येथील परिषदेत प्रसिद्ध केलेला Global Innovation Index 2026 याच विषयावर भाष्य करतो आहे. या निर्देशांकात म्हणजेच इंडेक्समध्ये भारत १३९ अर्थव्यवस्थांमध्ये ३८ व्या स्थानावर आहे.
या इंडेक्सनुसार भारताची प्रथमदर्शनी परिस्थिती बरी दिसत असली तरीही हा अहवाल सविस्तर कोणत्या गोष्टींविषयी भाष्य करतो, भारत त्यात कुठे कमी आहे, भारताच्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत हे सगळं आपण सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.