Global risk report
Esakal
पुणे – जगात तिसरं महायुद्ध होणार का? रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष आणि विविध देशांमधील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. पण जगासमोरील सर्वांत मोठं संकट नेमकं कोणतं? युद्ध, हवामान बदल, आर्थिक अस्थिरता की कृत्रिम बुद्धिमत्ता? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील १३०० हून अधिक जाणकारांचं सर्वेक्षण केलं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष जागतिक परिस्थितीविषयी महत्त्वाचे संकेत देणारे आहेत.
या सर्वेक्षणातील ३६ टक्के जाणकारांना पुढील एका वर्षात मोठ्या युद्धाचे परिणाम जगातील मोठ्या प्रमाणात लोकांना भोगावे लागू शकतात, असं वाटतं. पुढील सात वर्षांचा विचार केला तर हे प्रमाण थेट ७६ टक्क्यांपर्यंत पोहोचतं. विशेष म्हणजे २०२४ च्या तुलनेत मोठ्या युद्धाचा धोका किती लवकर उद्भवू शकतो, यासंबंधीच्या क्रमवारीत त्याने दोन वर्षातच १६ अंकाने जग पुढे आलं आहे.. त्यामुळेच खरंच धोक्याची घंटा आहे का?
संयुक्त राष्ट्रांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या Global Risk Report 2026 मध्ये याविषयीचे आकडे आहेत. हे जाणकारांना जरी वाटत असलं तरी या जाणकारांमध्ये सरकारी अधिकारी, संशोधक व अभ्यासक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनीधी, नागरी संस्थांचे प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेत असणारे प्रतिनिधी अशा मोठ्या मंडळींचा समावेश आहे. त्यामुळे या विषयात रोज निर्णय घेणारी, त्या विषयात काम करणारी, अभ्यास करणारी मंडळी यात आहे. त्यामुळेच हा रिपोर्ट खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं ठरतं आहे.
तसेच जगात जो विषय हलक्यात घेतला जातोय त्या हवामान बदलाचं संकट किती मोठं आहे, याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतील हे सगळं या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.