

From China demand to green energy push — what’s driving the copper rally?
E sakal
Digital economy, EV expansion and supply tightness fuel copper price surge.
सोनं आणि चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पण आता तांब्याचे भावही वाढायला लागलेत. सोन्या-चांदीचं एक ठीक आहे पण तांब्याचे भाव वाढण्याचं कारण काय, असा प्रश्न पडतोच. याचं कारण आहे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि ग्रीन एनर्जी... हो बरोबर वाचलंय तुम्ही. या दोन्ही गोष्टींना चालना देण्यात तांब्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच भू-राजकीय परिस्थितीचाही तांब्याच्या दरांवर परिणाम होत असतो. आता तो नेमका कसा, गोल्डमन सॅक्स रिसर्चसारखे अहवाल तांब्याच्या दरातील चढउताराबद्दल काय सांगतात हे सगळं जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.
२०२६ मध्ये तांब्याच्या जागतिक किंमतीने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. लंडन मेटल एक्स्चेंजवर ते $१४ हजार प्रति टनच्या पातळीवर किंवा त्याच्या आसपास पोहोचले आहे, ज्यामुळे हा धातू जागतिक बाजारात विक्रमी दरावर ट्रेड होत आहे. भारतातही ३० जानेवारी २०२६ रोजी तांब्याचे भाव जवळपास ₹ १३८१ प्रति किलोपर्यंत वाढले होते.
MCX Copper historic data नुसार, १ जानेवारी २०२५ पासून ३० जानेवारी २०२६ पर्यंत तांब्याचा भाव ₹७९३.८५/kg पासून ₹१,२९२+ दरापर्यंत वाढला आहे, जो सुमारे ६०-७०% च्या आसपास वाढ दाखवतो.
MCX = Multi Commodity Exchange of India हे भारतातील एक प्रमुख कमॉडिटि एक्स्चेंज आहे. सोने, चांदी, तांबे, कच्चे तेल (Crude Oil), नैसर्गिक वायू (Natural Gas) अशा वस्तूंचे व्यवहार (ट्रेडिंग) होतात.