

अमित मोडक, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे सीईओ आणि ज्येष्ठ कमोडिटीतज्ज्ञ
ceo.pngs@gmail.com
दीर्घकाळासाठी विचार केला, तर सोन्यातून इथून पुढे दरवर्षी ८ ते १० टक्के परतावा मिळेल आणि हा परतावा बॅंक ठेवींपेक्षा जास्त असेल. सोने सकारात्मक परतावा देते. सोने महागाई दराइतके किंवा त्यापेक्षाही जास्त वाढते. आगामी तीन वर्षांत सोन्याच्या भावामध्ये २५ टक्के वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चांदीच्या भाववाढीचा संबंध हा पूर्णपणे औद्योगिक बाजारपेठेशी आहे. चांदीचा उपयोग जसजसा वाढेल, तसतशी तिची मागणी वाढेल आणि चांदी महाग होत जाणार आहे.