Premium|Gulzar Mumbai Litfest 2026 : गुलजार यांच्या कवितांतून उलगडली मुंबईच्या बदलत्या रूपाची कहाणी

Gulzar Mumbai Litfest 2026 : मुंबईने गुलजार यांना आसरा, स्वप्ने आणि नवी ओळख दिली. त्यांच्या कवितांतून शहराचे बदलते रूप, विसंगती आणि माणसांचे जगणे उलगडले.
Gulzar Mumbai Litfest 2026

Gulzar Mumbai Litfest 2026

esakal

Updated on: 

विनोद राऊत - vinod.raut@esakal.com

सहा दशकांपूर्वी मुंबईत आलेल्या गुलजार यांनी या शहराला केवळ जवळून पाहिले नाही, तर त्याच्या बदलत्या रूपाचे, विसंगतींचे आणि माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म चित्र आपल्या कवितांतून रेखाटले. त्यांच्या नजरेतून मुंबईकडे पाहताना शहराची नवी ओळख होते आणि स्वतःच्या जगण्याचेही भान येते. ‘मुंबई लिटफेस्ट’मधील त्यांच्या सुरेल संवादाचा शब्दवेध...

लिटरेचर लाइव्ह! मुंबई लिटफेस्ट २०२६ साहित्य महोत्सव नुकताच पार पडला. नरीमन पॉइंटच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्‌समध्ये (एनसीपीए) तीन दिवस रंगलेल्या या महोत्सवाला साहित्यप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. साहित्याच्या या उत्सवात गुलजार, जावेद अख्तर, शेफाली शहा, रामचंद्र गुहा, शशी थरूर, आदिल रुस्तमजी, डॉ. कौशिक बसू, अजित रानडे, गझाला वहाब, हरिंदर बावेजा, इरा दुबे, पवन वर्मा, शांता गोखले, सुमंत्र घोषाल आदी नामवंत लेखक, कवी, साहित्यिक, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. त्यातील ‘एक शायर इस शहर में’ हे गुलजार यांचे सत्र विशेष गाजले...

मनामनात रुजले.

गुलजार आपल्या कविता गुणगुणत होते आणि आपल्याला मुंबईची नव्याने ओळख होत होती... ‘मी सहा दशकांपूर्वी मुंबईत आलो. फाळणीच्या जखमा सोसलेल्या मला माझ्या आई-वडिलांनी दिल्लीहून मुंबईला पाठवले. या शहराने माझा हात हातात घेतला. मुंबईने मला आसरा दिला, स्वप्न दिले, मला घडवले आणि परिवारही मिळवून दिला. मात्र, मुंबई आता साठ वर्षांपूर्वीची राहिलेली नाही... ये शहर वो नहीं, जहाँ साठ साल पहले मैं आया था,’ अशा शब्दांत गुलजार यांनी मुंबईविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

एनसीपीएच्या मुख्य सभागृहात तासभर रंगलेल्या या संवादाच्या मैफलीत गुलजार यांच्या प्रत्येक कवितेला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या सत्रात लेखिका आणि अभ्यासक रक्षंदा जलील अन् कौसर मुनीर यांनी गुलजार यांच्याशी संवाद साधला. मुंबईविषयीच्या गुलजार यांच्या भावना, त्यांची निरीक्षणे आणि या शहराकडे पाहण्याची त्यांची वेगळी दृष्टी या संवादातून उलगडत गेली. आपल्या आजूबाजूच्या घटना आणि भोवतालचे विश्व पाहण्याची एक वेगळीच नजर अन् नजाकत गुलजार यांच्या लेखनात आहे. त्यामुळे आपण अनेक वर्षे ज्या शहरात राहतो-फिरतो त्याकडे त्यांच्या नजरेतून पाहताना एक वेगळाच अनुभव येतो.

Loading content, please wait...