
Guru Pushya Amrit Yog
esakal
गुरुपुष्यामृत योग ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती एक सकारात्मक मानसिकता निर्माण करणारी संधी आहे. योग्य नियोजन, विचारपूर्वक गुंतवणूक आणि सकारात्मक कृती यांच्या साह्याने या दिवशी टाकलेली पावले आपल्याला आर्थिक समृद्धीच्या दिशेने नेतात. गुरुपुष्यामृत योग असलेल्या दिवसाचे वैशिष्ट्य काय आणि त्या दिवशी कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीची सुरुवात करता येते, याविषयी माहिती देणारा हा लेख....
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात अर्थप्राप्ती करत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या विवाहासाठी आणि निवृत्तीच्या जीवनासाठी पैशांची बचत करते; पण निव्वळ बचत करून त्यात वृद्धी होत नाही. यासाठी योग्य गुंतवणूक करणे फायद्याचे असते. कारण मुद्दलात व्याज किंवा परतावा यांची भर पडून वाढ होते. आता ही गुंतवणूक करताना गुरुपुष्यामृत योग केव्हा आहे, हे लक्षात घेऊन त्या दिवशी गुंतवणूक करण्याचा मुहूर्त साधला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य काय आहे, हे पाहू या.