
डॉ. प्रणिता अशोक
‘कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) खाल्ली म्हणजे वजन वाढते, साखर वाढते. फीट राहायचे असेल, जिममध्ये जाऊन पिळदार शरीर कमवायचे असेल तर कर्बोदके शक्य तितकी टाळावीत, आणि किटोसारखे डाएट करावे,’ - अशा प्रकारचे समज आणि गैरसमज सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पसरलेले दिसतात. पण खरे पाहता, कर्बोदकांबाबत अशा पद्धतीने एकांगी निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. कोणतेही पोषकघटक ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ ठरविण्याआधी, त्यांची शरीरातील भूमिका समजून घेणे आवश्यक असते.