

Hindu Marriage: Are Rituals Mandatory or Is Registration Sufficient?
Esakal
Hindu Marriage Act: सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, केवळ विवाह प्रमाणपत्राच्या आधारे पती-पत्नीचा कायदेशीर दर्जा निर्माण होत नाही. जोवर हिंदु पद्धतीप्रमाणे आवश्यक हिंदु विवाहविधी पार पाडलेले नसतात तोवर तो विवाह वैध धरता येणार नाही. पारंपरिक संस्कार अथवा विधी नसतील तर ती कृती कायदेशीरदृष्ट्या अर्थहीन ठरते, असं न्यायालयाने जाहीर केलं.
या निरीक्षणामुळे प्रश्नांचे तरंग उठले.
न्यायालयाने हे म्हटलं आहे ते नेमक्या कोणत्या आणि कोणाच्या बाबतीत? हा परिस्थितीजन्य निर्णय आहे की, सरसकट हाच नियम लागू होतो? याचा अर्थ ज्यांनी विवाहाविधी पार पाडलेले नाहीत त्यांचा विवाह वैध धरला जाणार नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तज्ज्ञांकडून जाणून घेऊ, या विषयातील सविस्तर माहिती वाचा, सकाळ प्लसच्या या लेखात.