
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
हजारो वर्षांपूर्वी जंगलात फिरताना नुसता काहीतरी आवाज काढून एकमेकांशी बोलणारी माणसं हळूहळू आपल्या टोळ्या बनवू लागली. आपल्या टोळीची खूण ठरवू लागली. या खुणा भाषेची सुरुवात झाल्या. आता आपल्या सगळ्याच भाषा साचत जाताहेत...
माणसं जंगलात भटकत होती, हजारो वर्षं. प्राणी वगैरे खायचे तेव्हा शिकार करून. मग शिकार करायची कशी? टोकदार काही पाहिजे.