
Indian sword history
esakal
गिरिजा दुधाट
dayadconsultancies@gmail.com
वाचकहो, सदर सुरू होऊन निम्म्यावर आलं, तरी अजून ‘ती’ कशी आली नाही? असा विचार तुम्ही करताय ना? अहो, कोण काय! तीच... भारतीय शस्त्रागाराची अभिषिक्त सम्राज्ञी.. सधारा, अक्षता, सपाणि..‘तलवार’! बाकी शस्त्रजगतात अनेक शस्त्रे ही आधी शिकारीची शस्त्रे म्हणून विकसित झाली (भाला, धनुष्यबाण वगैरे), त्यांना पहिला पाया ‘संरक्षणाचा’ होता, पण तलवार शस्त्र हे माणसाने ‘माणसाला’च मारण्यासाठी पहिल्यांदा विकसित केलं.
तलवारीच्या विकासाचा पाया हा ‘आक्रमणाचा’ होता! बाकी शस्त्रांपेक्षा तलवार एवढी प्रसिद्ध का झाली? असा विचार केला तर लक्षात येतं की, तलवार हे एकमेव शस्त्र आहे ज्याला पूर्ण लांबीचं पातं आहे, ज्याने समोरच्यावर वरपासून खालपर्यंत वार केला जाऊ शकतो! बाकी कुठल्याही सधारा शस्त्रांना (बाण, भाले, चाकू-सुरे, कुऱ्हाडी इ.) लांब पाती नाहीत. त्यामुळे समोरच्यावर घातक वार करण्याची त्यांची क्षमता तलवारीपेक्षा मर्यादित आहे.