Premium|Iran US Conflict: पुन्हा होर्मुझ, पुन्हा युद्ध! ट्रम्पचा माथेफिरूपणा आणि युद्धाचा भडका

Strait of Hormuz : ट्रम्प यांनी इराण युद्धातील ६० दिवसांसाठीचा समझोता निकालात निघाल्याचं जाहीर केलं. म्हणजे जे युद्ध थांबलं असं वाटत होतं त्याचा पुन्हा भडका उडेल, अशा अवस्थेला आलं.
Hormuz Crisis Returns: Why the Iran-US Conflict Threatens Global Oil Suppl

Hormuz Crisis Returns: Why the Iran-US Conflict Threatens Global Oil Suppl

E sakal

Updated on

Iran, America and the Strait of Hormuz: The Conflict Reshaping West Asia

श्रीराम पवार - shriram1.pawar@gmail.com

खरंतर इराणचा होर्मुझवर नियंत्रणाचा आग्रह आंतरराष्ट्रीय कायद्यांशी विसंगत आहे, मात्र तो बळानं मोडता येत नाही आणि वाटाघाटीतूनही ते साधत नाही, हेही अमेरिकेच्या त्राग्यामागचं कारण आहे. इराणच्या या हल्ल्यांना अमेरिकनं तिखट उत्तर दिलं आणि १७० ठिकाणी हल्ले केले. त्यावर प्रत्युत्तर म्हणून इराणनं कतार, बहारिन आदी ठिकाणच्या अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्रं डागली, करार होऊ नये असं वाटणाऱ्या इस्राईलनं संधी साधत लेबनाॅनमधील कारवाई पुन्हा सुरू केली. अमेरिकेनं या वेळी इराणच्या चाबाहर बंदराला लक्ष्य केलं. ही चाल भारतासाठी लक्ष वेधणारी. याच बंदराचा विकास करण्याचा प्रकल्प भारत साकारणार होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com