

India economic outlook 2025
esakal
डॉ. अनिल धनेश्वर
जगात आर्थिक पेचप्रसंग असला तरी भारताची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत जागतिक व्यापाराच्या बाबतीत दीर्घकालीन धोरणे राबविण्याच्या प्रयत्नात न पडता अकल्पित व अनाकलनीय होणाऱ्या बदलास धैर्याने सामोरे जाणे याशिवाय पर्याय नाही.
कधी नव्हती एवढी अस्थिरता आज आपण जागतिक अर्थव्यवस्थेत अनुभवत आहोत. दूरगामी आर्थिक तसेच व्यावसायिक धोरणे आखणे व यशस्वीरीत्या राबविणे ही एक फार अवघड व अस्थिर प्रक्रिया होऊन बसली आहे. पण यातूनही विविध देशांतील अर्थव्यवस्था खूप काही शिकत आहेत. यासंदर्भात भारतातील परिस्थितीवर एक नजर टाकू या.