

Russia foreign fighters Ukraine
esakal
जतीन देसाई
भारतासह परदेशातील हजारो तरुण रशियाच्या वतीने युद्ध लढत आहेत. देशासाठी समर्पित वृत्तीने लढणाऱ्या सैन्याऐवजी आता पैसे देऊन सैन्य उभे करण्याचा पायंडा पडणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
र शिया ही महासत्ता असली तरी युक्रेनविरुद्ध त्यांनी सुरू केलेले युद्ध अजूनतरी त्यांना जिंकता आलेले नाही. २०२२च्या २४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि तेव्हापासून ते सुरू आहे. जवळपास दोन ते अडीच लाख रशियन सैनिक युद्धात मारले गेले, असे म्हटले जाते. त्याहून कितीतरी अधिक जखमी झाले आहेत. मोठ्या संख्येने रशियन सैनिक मृत्युमुखी पडत असल्याने रशियातदेखील अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजी दिसायला लागली आहे.