
"माझी आई मागच्या महिन्यात रिटायर झाली. तिचं नुकतंच पेन्शन सुरु झालं. आणि तिने सरसकट सगळे पैसे FD करता येतील का असा प्रश्न विचारला. आता मी तिला यावर काय सांगू! आणि मुळात तिला पटणार तरी आहे का मी सांगेन ते! काय बरं करावं? कसं सांगावं आईला? पण त्या आधी मलाच जरा अभ्यास करावा लागेल या रिटायरमेंट नंतरच्या इन्व्हेस्टमेंटचा."
हे सगळे विचार मीनलच्या डोक्यात भुणभुण करत होते. रिटायरमेंट पर्यंतच्या सेविंग बद्दल सगळेच कधीतरी विचार करतात. पण त्यानंतर काय? पेन्शनचं काय? साठलेल्या पुंजीचं काय? एकदम मिळालेल्या पॉलिसीच्या पैश्यांचं करायचं तरी काय? हे सगळंच तसं किचकट काम म्हणायचं. मग विल्हेवाट लावायची कशी?
रिटायरमेंट नंतरच्या कमाईचं, पैश्यांचं काय करायचं? ते कुठे गुंतवायचे? की FDच उत्तम म्हणायचं? तर नाही, प्रत्येक काळातल्या गुंतवणुकीला एक दिशा असायला हवी. छोटे-मोठे गोल्स असायला हवेत. ते गोल्स कशाप्रकारचे असू शकतात? या वयातले गुंतवणुकीसाठीचे सुरक्षित पण उत्तम पर्याय कोणते? तुमचे असे सगळे प्रश्न 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखाद्वारे सुटणार आहेत...