
inherited wealth planning
esakal
आई-बाबा, आजी-आजोबा आणि सगळेच मोठे आपल्याला काहीना काही देत असतात. प्रेम, जिव्हाळा आणि सोबतच काही प्रमाणात आर्थिक संपत्ती. ही संपत्ती अनेकदा वारसाहक्काने मिळते. अशा वेळी अचानक आलेल्या या संपत्तीचं काय करावं हे आपल्याला नीट माहित नसतं आणि कळतही नसतं. गोंधळ उडतो तो वेगळाच.
तुमच्या आई-बाबा, आजी-आजोबांनी तुमच्यासाठी ठेवलेला वारसा हा केवळ पैसा नसून, त्यांच्या कष्टाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्हाला मोठी रक्कम किंवा मालमत्ता वारसा हक्काने मिळते, तेव्हा साहजिकच आनंद होतो पण, त्या सोबत थोडं दडपणही येतं. पण या मिळालेल्या पैशाचा योग्य वापर करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. या वारसा हक्काचं योग्य नियोजन कसं करावं, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि काही गोष्टी टाळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता, नेमकं टाळायचं काय आणि करायचं काय? ते आपण 'सकाळ प्लस'च्या या लेखातून समजून घेउयात.