Premium|How to Remember What You Read : वाचलं; पण लक्षात राहिलं का?

Reading Retention Tips : वाचलेलं दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी योग्य पुस्तक निवड, सक्रिय वाचन, नोंदी, सारांश लेखन आणि ठराविक वेळेच्या वाचन सत्रांचा अवलंब प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
How to Remember What You Read

How to Remember What You Read

esakal

Updated on

रिता राममूर्ती गुप्ता - info@reetaramamurthygupta.in

वाचलेल्या गोष्टींमधील बोध लक्षात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या पुस्तकात पूर्णपणे मग्न होणं आणि त्याचा आनंद घेणं. थोडक्यात सांगायचं तर वाचलेलं लक्षात ठेवणं ही कोणतीही जादू नाही. ती जाणीवपूर्वक केलेली सवय आहे...

बहुतेक जण म्हणतात, की ते जे वाचतात ते लक्षात राहत नाही... पण समस्या पुस्तकात नसते; ती आपण त्यांना कसं हाताळतो, यात असते. वाचन हे विचार आणि कृतीसाठी चांगला सराव ठरू शकतं; पण त्यासाठी फक्त डोळ्यांनी ओळी स्कॅन करणं पुरेसं नसतं; तर त्यात सक्रिय सहभाग आवश्यक असतो.

खाली दिलेल्या काही वैज्ञानिक आधार असलेल्या सोप्या पद्धती तुम्हाला वाचलेलं अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायला मदत करतील. एक साधा नियम लक्षात ठेवा : पुस्तक वापरा, फक्त सजावटीसाठी ठेवू नका...

सर्वप्रथम, पुस्तकाची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या उद्दिष्टांशी किंवा कुतूहलाशी संबंधित पुस्तक निवडलं; तर ते अधिक लक्षात राहतं. फक्त दिखाव्यासाठी किंवा तात्पुरत्या उत्सुकतेपोटी घेतलेलं पुस्तक मनात ठसत नाही. ज्या पुस्तकाचा तुम्हाला खरोखर उपयोग होणार आहे, ते पूर्ण वाचा आणि त्याचा वापर करा. वाचनासाठी ठरावीक वेळ द्या... २५ ते ४५ मिनिटांच्या लक्षपूर्वक सत्रांमध्ये वाचणं अधिक परिणामकारक ठरतं; कारण एकाग्रता स्मरणशक्तीला बळकटी देते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com