
H-1B visa fee increase
esakal
मधुबन पिंगळे
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच१बी’ व्हिसाचे शुल्क एक लाख डॉलर करण्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेमुळे अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अमेरिकेत नोकरीसाठी जाणारे बहुतांश भारतीयांसाठी हाच व्हिसा उपयुक्त आहे. त्यामुळे, भारतीयांमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळे, ट्रम्प यांच्या या आदेशाचे विश्लेषण करण्यात येत आहे. कंपन्यांकडूनही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निर्णय न घेता, संयमाने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
उच्चशिक्षणाबरोबर नोकरीसाठी भारतातून अमेरिकेत जाण्याचे प्रमाण कायम आहे. यासाठी ‘एच१बी’ व्हिसा महत्त्वाचा आहे. त्यामुळेच, ‘एच१बी’चा कोटा आणि त्याच्या शुल्कावर चर्चा होत असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी घोषणा दिली आहे. तसेच, अन्य देशांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘एच१बी’ व्हिसाचे शुल्क एक लाख डॉलर करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे शुल्क सध्याच्या व्हिसाधारकांना आहे की केवळ नव्या व्हिसासाठी आहे, याविषयी संदिग्धता आहे. मात्र, अमेरिकेत नोकरी करत असलेल्या भारतीयांमध्ये याविषयी चिंतेचे वातावरण आहे.