
Share Buyback Tax Rules 2024
esakal
शेअर बाजारात आपण वेगवेगळे मार्ग वापरून नफा कमवत राहण्याच्या प्रयत्नात असतो. फार पूर्वीपासून, शेअर बाजारात नफा कमावण्याचा एक अत्यंत आकर्षक मार्ग म्हणजे 'शेअर बायबॅक'. बायबॅक म्हणजे जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स गुंतवणूकदारांकडून परत विकत घेते. आतापर्यंत, ही प्रक्रिया गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम, जवळपास 'कर-मुक्त' नफ्याची संधी होती. मात्र, गेल्या वर्षीपासून सरकारने हे नियम इतके बदलले आहेत की, तुमच्याकडे असलेल्या शेअरची किंमत जास्त असूनही बायबॅक ऑफर स्वीकारणं तुम्हाला तोट्याचं ठरू शकतं.
पण इतकी चांगली संधी असूनही, बायबॅक गडबडीचं का आहे बरं? समजून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...