
सुनील चावके
कलम ३७० हटविण्याचे धाडस मोदी सरकारने दाखविले. त्यामुळे स्थानिक काश्मिरींच्या मनात रोष निर्माण झाला. त्याची भरपाई पर्यटकांच्या संख्येत होणाऱ्या अभूतपूर्व वाढीमुळे व काश्मिरींच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक स्थैर्यामुळे होऊ लागली होती. पहलगामच्या घटनेने त्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा आव्हान आहे, ते पर्यटकांचा विश्वास संपादन करण्याचे.
प हलगाममध्ये सव्वीस निरपराध पर्यटकांची बावीस एप्रिलच्या दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली, या दहशतवादी हल्ल्याला दोन महिने पूर्ण झाले. या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा परिणाम देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या कोट्यवधी पर्यटकांच्या मानसिकतेवर झाला.