
चंद्रशेखर महाजन
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आणि कर्जमाफी देऊ, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात वचन होते. महायुती सत्तेवर आली; मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.
विरोधकांनी सरकारला कर्जमाफीवरून धारेवर धरले. माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले. सरकारने समिती जाहीर केली. तिचा अहवाल आल्यानंतर योग्यवेळी कर्जमाफी करून असे सरकारतर्फे सांगण्यात आले. केवळ बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे कर्जमाफी मिळेल का? आणि सरकार ती देणार का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.