
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
गेल्या काही वर्षांपासून भारताने आग्नेय आशियाला आपले प्राधान्यक्षेत्र म्हणून निवडले आहे. त्याआधी आपल्या परराष्ट्र धोरणाचा चेहरा युरोप-अमेरिकाकेंद्रित अर्थात पाश्चात्त्य देशांकडे होता. तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात त्याची सुरूवात झाली.
नंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येताच या धोरणाची जास्तच वेगाने प्रगती झाली आहे. दक्षिण आशियाई देशांशी आर्थिक, भूराजकीय व संरक्षण संबंध साधण्यासाठी चीन हा इतर प्रगत देशांसमोर अडथळा आहे. तसेच जपान हा देशही फार विश्वासू नसल्याने भारताबाबत विश्वास वाटतो. भारतालाही त्याची गरज आहे. काय आहे नेमके ‘ॲक्ट ईस्ट धोरण’...