Premium|Study Room : चीनला मागे टाकण्याचे स्वप्न; मॅन्युफॅक्चरिंग हब आणि जागतिक सप्लाय चेनसाठी भारताची नवी रणनीती

India GDP Ranking IMF 2026 : आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारताची जीडीपी क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण झाली असली, तरी पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणाद्वारे जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनून २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आणि संधी आता देशासमोर आहे.
India GDP Ranking IMF 2026

India GDP Ranking IMF 2026

esakal

Updated on

सध्याच्या IMF आकडेवारीनुसार भारत GDP मध्ये ४ थ्या स्थानावरून ६ व्या स्थानावर गेला आहे, तरी चौथ्यावरून सहाव्या क्रमांकावर घसरण ही केवळ आकड्यांची घसरण नाही, तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. ह्याला जागतिक परिस्थिती भलेही कारणीभूत असली तरी संरचनात्मक मजबुतीशिवाय पुढे जाता येणार नाही. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न केवळ GDP च्या वेगाने पूर्ण होणार नाही; त्यासाठी पायाभूत सुविधांचा मजबूत पाया उभारावा लागेल. रस्ते, रेल्वे, बंदरे, लॉजिस्टिक्स, ऊर्जा, डिजिटल नेटवर्क आणि शहरी पायाभूत सुविधा हाच पुढील आर्थिक झेपेचा कणा होऊ शकतो.

पायाभूत सुविधा संदर्भात भारत आणि चीन

भारत आणि चीनची अर्थव्यवस्था जवळपास सारखीच होती पण आज चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा ४-५ पटीने पुढे आहे, ह्यामागे अनेक कारणे आहेत पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पायाभूत सुविधा, ज्यामुळे चीन हा ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला आणि ग्लोबल सप्लाय चेनचा महत्वाचा घटक बनू शकला.
भारताचे आताचे उद्दिष्ट केवळ चीनची बरोबरी करणे नाही, तर 'चायना प्लस वन' या जागतिक धोरणाचा फायदा घेऊन जगाची विश्वासार्ह सप्लाय चेन बनणे हे आहे. त्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे, सध्या भारताचे अर्थव्यवस्था उद्दिष्ट हेच आहे की, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनणे आणि जागतिक 'मॅन्युफॅक्चरिंग हब' बनून २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com