India Asian Games 2026 performance compared with Hangzhou
esakal
India spent Rs 800.70 crore for Asian Games 2026 preparations: भारताला नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २१ सुवर्णसह एकूण ८५ पदकांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण, तीन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकूण १०६ पदकांच्या तुलनेत यंदाची पदकसंख्या २१ ने कमी झाली आणि त्यात ६ सुवर्णपदकं कमी आहेत. भारताचे ५०१ खेळाडू जपानमध्ये पदकासाठी दाखल झाले होते आणि त्यापैकी १६ क्रीडा प्रकारातील १३७ खेळाडू रिकाम्या हाती परतले. ही संख्या कमी असली तरी भारतीय खेळाडूंची कामगिरी चिंता वाढवणारी नक्कीच आहे, कारण या स्पर्धेच्या तयारीसाठी भारत सरकारने ८००.७० कोटी रुपये खर्च केले होते.