
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाण्याच्या प्रवासात भारताला सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावे लागेल. तसे व्हायचे असेल तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासावर मोठा भर द्यावा लागणार आहे.
अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमीकंडक्टर चिपसंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. आगामी दोन ते तीन आठवड्यांत सेमीकंडक्टरच्या आयातीवरही दोनशे टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे दर सुरुवातीला कमी असतील, जेणेकरून कंपन्यांना अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी वेळ आणि संधी मिळेल.