
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी बेभान स्पर्धा सुरू आहे. परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे रोखण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न होत आहेत. भारताला पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर हा ‘ब्रेन ड्रेन’ रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
नामवंत परदेशी विद्यापीठांचे कॅम्पसेस असणारी भारतातील पहिली ‘एज्युसिटी’ नवी मुंबई येथे आकाराला येते आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना या ‘सिटी’त स्वतंत्र कॅम्पसेस उभारण्याची परवानगी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.