
ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित (निवृत्त)
चीनने सीमाप्रश्न सोडवण्याची कोणतीही ठोस इच्छा कधीच दाखवली नाही. उलट हा मुद्दा कायम जिवंत ठेवून तो भारतावर दबाव आणण्यासाठी आणि इतर विषयांमध्येही सवलती मिळवण्यासाठी बीजिंगने वापरला आहे. वीसपेक्षा अधिक प्रतिनिधींच्या चर्चेनंतरही परिस्थिती सुधारलेली नाही.
भा रत-चीन संबंधांमध्ये अलीकडच्या काही महिन्यांत नवा उत्साह दिसतो आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची बीजिंग भेट, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेतील सहभाग, या घडामोडींनी जणू द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळणार असल्याचा आभास निर्माण केला गेला.