

Afghanistan-Pakistan Conflict
esakal
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांनी नुकताच भारत दौरा केला. तालिबानची राजवट आल्यानंतर प्रथमच या सरकारमधील मंत्र्याने भारताला भेट दिली. आता भारत काबूलमधील दूतावासही सुरू करणार आहे. यातून दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवर संबंध प्रस्थापित होणार आहेत. बदलती भूराजकीय परिस्थिती आणि अमेरिका-पाकिस्तानच्या भूमिकेत बदल यांमुळे भारतानेही पवित्रा बदलला असून, आता भारत तालिबानच्या राजवटीला मान्यता देणार, हेच स्पष्ट होत आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युद्धसंघर्षाचा भडका उडाला असून. येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोन्ही देशांच्या संबंधांना; तसेच अफगाणिस्तानात शासन प्रस्थापित करणाऱ्या तालिबानसोबतच्या पाकिस्तानच्या संबंधांना प्रदीर्घ इतिहास आहे. परंतु अलीकडील काळात या संबंधांमध्ये घनिष्ठ संबंधांचे पर्व संपून कटुता, वितुष्ट आणि आता तर थेट शत्रुत्व निर्माण झाल्याचे दिसत आहे.