

UN Security Council reforms India permanent seat
esakal
डॉ. मनीष दाभाडे
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. या संघटनेला ८० वर्षे पूर्ण होत असून, आजही ही संघटना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळाप्रमाणेच कार्यरत आहे. बदलत्या जगाचे प्रतिबिंब या संघटनेमध्येही दिसले, तर ‘संयुक्त राष्ट्रे’ ही संघटना कार्यक्षम ठरेल.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला ८० वर्षे पूर्ण होत असून, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे या संघटनेच्या कार्यक्षमतेबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. युक्रेन युद्ध, गाझातील संघर्षानंतर निर्माण झालेले संकट, पश्चिम आशियातील तणाव, जगभर वाढणारी महागाई, कर्जसंकट आणि हवामानबदल या सर्वांचा सामना करण्यासाठी जगाला प्रभावी बहुपक्षीय व्यवस्थेची गरज आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आज विसाव्या शतकातील संरचनेत अडकलेली आहे.