

India European Union free trade agreement benefits
esakal
भारत-युरोप व्यापार करार हा केवळ व्यापाराचा करार नसून, तो भारताच्या जागतिक ताकदीचे प्रतीक आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला यामुळे जागतिक व्यासपीठ मिळेल, तसेच भारतीय उद्योग, रोजगार आणि बाजाराला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने विचार केल्यास, हा करार मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या सर्व गोष्टींसाठी हा करार ‘गेमचेंजर’ ठरू शकतो.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेला नवा व्यापार करार (भारत-ईयू एफटीए) हा देशासाठी खूप मोठा टप्पा आहे. आता भारतात बनणाऱ्या अनेक वस्तू युरोपमध्ये स्वस्तात विकता येणार आहेत. यामुळे भारतीय उद्योग, रोजगार आणि शेअर बाजाराला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुप्रतीक्षित ‘फ्री ट्रेड ॲग्रीमेंट’ शेवटी जवळपास दोन दशकांचे वाट पाहून पूर्ण झाले आहे. हा करार केवळ दोन बाजूंच्या व्यापारासाठी नव्हे, तर हे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका मजबूत करणारे ऐतिहासिक पाऊल आहे.