Premium|India European Union Trade Relations : संध्या-छाया भिवविती पश्चिमेला

India European Union Trade Relations : लोकसंख्या बदल, उद्योगांपुढील आव्हाने आणि आर्थिक संकटांमुळे युरोपची स्थिती बदलत आहे. अशा परिस्थितीत भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारातून भारतीय उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.
India European Union Trade Relations

India European Union Trade Relations

esakal

Updated on: 

औद्योगिक क्रांतीसाठी निसर्गाची केलेली अपरिमित हानी, त्याचे दुष्परिणाम आणि त्यातून आता दुसरं टोक गाठत अंमलात आणलेले कठोर पर्यावरण कायदे, त्यामुळं वाढलेली महागाई अशी

एकापाठोपाठ एक संकटं पश्चिम युरोपवर आदळत आहेत.

या संकटांमध्ये भर म्हणून आफ्रिका, आशिया खंडातले

विस्थापित आणि अमेरिका लादत असलेली युद्धखोरी

यांनी पश्चिमेला जेरीस आणलं आहे. अत्यंत कष्टपूर्वक,

नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा,

उद्योग-व्यवसाय, जागतिक बाजारपेठा यांचं सातत्य राखण्यात लोकसंख्येचं बदललेलं चित्र सर्वाधिक मोठं आव्हान ठरलं आहे...

‘‘आम्हाला जर्मन कंपनी विकत घ्यायचीय. कंपनीला प्रदीर्घ परंपरा आहे. उत्पादनांचा दर्जा उत्तम आहे आणि जागतिक बाजारपेठेत मागणीही आहे. कंपनीच्या वृद्ध संस्थापकांकडे आता कंपनी चालवायला कुटुंबात कोणी उत्तराधिकारी उरलेला नाही. त्यामुळं, त्यांना कंपनी सुरू ठेवता येणार नव्हती. मग आम्ही एक प्रस्ताव दिला. पुढील काही वर्षे कंपनीचं ब्रँड नेम तेच ठेवू. संस्थापकांचाही समावेश कंपनीत कायम राहील; मात्र कंपनीची मालकी आमच्याकडे येईल. संस्थापकांनी प्रस्ताव मान्य केला. आता पुढची प्रक्रिया सुरू करतोय...’’

पाश्चिमात्य उद्यमशीलतेचा मानबिंदू असलेल्या जर्मनीत बर्लिनमध्ये बसून भारतीय उद्योजक सांगत होता. उद्योजकाचं वय साधारण चाळिशीच्या आत. जर्मन संस्थापकांनी वयाची ८० गाठलेली. भारतीय उद्योजकानं सांगितलेली कथा ही आजच्या पाश्चिमात्य जगाचं वास्तव आहे. हा भारतीय उद्योजक एका शिष्टमंडळाचा भाग होता. हे शिष्टमंडळ केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली जर्मनी-नेदरलँड्सच्या दौऱ्यावर होतं. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात होऊ घातलेला ‘मुक्त व्यापार करार २०२७’च्या पहिल्या तिमाहीत अंमलात येण्याची चिन्हे आहेत. या कराराचा संदर्भ दौऱ्याला होता. त्याअनुषंगानं शिष्टमंडळाच्या भारतातून जर्मनी, नेदरलँड्समध्ये शिकत असलेले विद्यार्थी, स्थायिक झालेले भारतीय नोकरदार-उद्योजक यांच्याशी गाठीभेटी झाल्या. जर्मनी-नेदरलँड्सच्या मंत्री, उद्योजक-व्यापाऱ्यांशी चर्चा झाल्या. त्यातून उलगडत असलेला युरोपीय महासंघ, ज्यामध्ये २७ देशांचा समावेश आहे, भारतासाठी एक अफाट संधी आहे आणि ती संधी हुकली, तर भारतीय बाजारपेठ गमावण्याचा विलक्षण धोकाही आहे.

India European Union Trade Relations
Premium | Maharashtra Deforestation: ३,००० मेगावॉट विजेसाठी ३२ हजार झाडांचा बळी? काय आहे साई डोंगर प्रकल्प?
Loading content, please wait...