
Foreign Policy
esakal
डॉ.अशोक कुडले
बदलत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला अर्थव्यवस्थेची नियोजित उद्दिष्टे गाठण्यासाठी, देशाची सुरक्षा व संरक्षणसिद्धता उच्चतम पातळीवर नेण्यासाठी भारताला सर्वव्यापी व सावध परराष्ट्रीय धोरणाची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सध्याच्या धोरणाचा फेरआढावा घ्यायला हवा.
आं तरराष्ट्रीय राजकारण व व्यापारात अभूतपूर्व उलथापालथ होत आहे. इस्राईलच्या जगाला हादरवणाऱ्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व सौदी अरेबियाचा अनपेक्षित सुरक्षाकरार, रशियाच्या युद्धखोरीमुळे रशिया व अमेरिका,-युरोपमधील कधी नव्हे इतके ताणलेले संबंध, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात व एकूणच अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणासंदर्भात घेतले जात असलेले एकामागून एक धक्कादायक निर्णय, एच-वन बी व्हिसाबाबत नव्याने जाहीर केलेले कडक धोरण, या बदलत्या जागतिक परिस्थितीचा भारताच्या परकी व्यापार, आंतरराष्ट्रीय सुरक्षा करार तसेच परराष्ट्रीय संबंधांवर काय परिणाम होईल, याचा आढावा घ्यायला हवा.