
युगांक गोयल, कृती भार्गव
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालातील निष्कर्षांमधून पोषणसंवेदनशील विकासाचा दृष्टिकोन स्वीकारणे, ही एक निश्चित गरज अधोरेखित होते. भारत आपल्या लोकसंख्या अन् रोगप्रकारातील संक्रमणाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर पोषण विषमता कमी करणे हे मानवी भांडवलाची गुणवत्ता वाढवण्यासोबतच सर्वसमावेशक आर्थिक विकासाचेही प्रमुख साधन ठरेल...
पोषण आहाराकडे पाहण्याचा नव्या सांख्यिकीय दृष्टिकोनातून पाहून त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न नुकताच झाला. २ जुलै २०२५ रोजी, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ‘भारतातील पोषण तत्त्वांचे सेवन’ या शीर्षकाचा एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला.