
India GDP growth
esakal
वैभवी पिंगळे
जीडीपी वाढीचा दर उत्साहवर्धक असला तरी काही त्रुटी, कमतरता भारतीय अर्थव्यवस्थेला अद्यापही भेडसावत आहेत. धोरणकर्त्यांनी त्या ओळखून निर्णायकपणे कृती केली, तर सध्याची गती कायम राखून अधिक वेगाने पुढे जाणे शक्य होईल.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी तिमाही जीडीपी अंदाज जाहीर केला, ज्यामध्ये २०२५-२६ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी वाढली असल्याचे म्हटले आहे. प्रथमदर्शनी अतिशय उत्साहवर्धक अशी ही बातमी. विशेषतः गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत विकास दर ६.५ टक्क्यांवरून वाढला आहे. परंतु या आकडेवारीखाली एक अधिक सूक्ष्मकथा दडली आहे. जी सामर्थ्य आणि कमकुवतपणा दोन्हींकडे निर्देश करते.