
West East conflict
esakal
लेखक - महेश शिंदे
२०२५ मध्ये जागतिक राजकारणाची दिशा पाहिली तर जग दोन ध्रुवांमध्ये विभागले गेलेले स्पष्ट दिसते. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्चिमेकडील संघटना नाटो देश, जपान आणि ऑस्ट्रेलियासह एका बाजूस ठाम उभी आहे. दुसऱ्या बाजूस चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील पूर्वेकडील गट उदयाला येत असून त्याला इराण व उत्तर कोरियासारख्या देशांचे समर्थन मिळत आहे.
ही अलीकडील परिस्थिती शीतयुद्धातील साचेबद्ध द्विध्रुवीय संग्रामासारखी नक्कीच नाहीये. आजची झुंज अधिक गुंतागुंतीची, बहुध्रुवीय जगात चालणारी असून व्यापारातील मतभेद, उर्जा संकटे, तांत्रिक स्पर्धा, आर्क्टिकसारख्या नवनवीन क्षेत्रांवरचे वर्चस्व यावर केंद्रित आहे.
भारताच्या दृष्टीने ही ध्रुवीकरणाची वेळ एकीकडे संधी तर दुसरीकडे धोकाही घेऊन आली आहे. कारण भारताला एकीकडे स्वायत्ततेचे धोरण जपायचे आहे, तर दुसरीकडे विविध भागांतून लाभ मिळवत जागतिक दक्षिणेचे नेतृत्वही करायचे आहे. प्रश्न असा आहे की, या अस्थिर व्यवस्थेत भारताने पुढील दिशा कोणती घ्यावी?