

India Southeast Asia Relations
esakal
डॉ. पुलि ंद सामंत - sakal.avtaran@gmail.com
गेली नऊ वर्षे भारत आणि आग्नेय आशियामधील (विशेषत: इंडोनेशिया) प्राचीन ते अर्वाचीन परस्पर-संबंधांचे अभ्यासक असलेले पीएच.डी. पदवीधारक डॉ. पुलिंद सामंत संशोधक, लेखक, स्तंभलेखक आणि अनुवादक आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या पाक्षिक सदरात ते भारत आणि पूर्व आशियातील इतिहास, संस्कृती व समकालीन संबंधांचा वेध घेणार आहेत.
जुन्या पिढीतील, म्हणजे आता साठीला पोहोचलेल्या रसिक मराठी वाचकांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व गणल्या गेलेल्या कै. पु. ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनपर लेखनातील ‘पूर्वरंग’ आणि ‘अपूर्वाई’ ही दोन पुस्तके आठवत असतील. त्यातील ‘पूर्वरंग’ हे पुस्तक पु. लं.च्या भारताच्या पूर्वेकडील देशांतील प्रवासवर्णनाबाबत होते; तर ‘अपूर्वाई’ हे त्यांच्या पाश्चात्य देशांतील प्रवासवर्णनाच्या संदर्भात होते.