प्रत्येक खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या मसाल्यांशिवाय भारतीयांचे स्वयंपाकघर पूर्ण होऊच शकत नाही. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्याचे काम भारतीय मसाले करतात.
मसाल्यांचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारतात दरवर्षी ८० हजार कोटींची उलाढाल होते. सध्या वर्षाला सुमारे ४०० कोटी डॉलरचे मसाले निर्यात होतात. हाच आकडा २०३० पर्यंत एक हजार कोटी डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे; परंतु अलीकडच्या काही काळात जागतिक बाजारपेठेत भारतीय मसाल्यांमध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आले.
मध्यंतरी काही युरोपीय देशांनी ५२७ भारतीय मसाल्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक आढळल्याचा आरोप केला होता. त्यावरून केंद्र सरकारने अनेक कंपन्यांवर कारवाईही केली. त्यामुळे केवळ खुल्या बाजारातीलच नव्हे, तर देशातील नामांकित कंपन्यांच्या मसाल्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या पार्श्वभूमीवर भारतीय मसाल्यांची बाजारपेठ, मसाल्यांमध्ये भेसळ कशी होते. भेसळयुक्त मसाले कसे ओळखावे, त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात, त्याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत, भेसळ आढळल्यास तक्रार कुठे करावी, याविषयी....