Premium|Study Room : भारतातील व्याघ्र प्रजातींची यशोगाथा; प्रोजेक्ट टायगरपासून बिग कॅट अलायन्सपर्यंत संरक्षण, धोरण आणि सहअस्तित्व

Impact of Human Interference on Wildlife Habitats : भारतातील वन्यजीव परिसंस्थेचे संतुलन राखणाऱ्या 'प्रोजेक्ट टायगर' अंतर्गत देशात ५८ व्याघ्र प्रकल्प कार्यरत असून, 'कोर' आणि 'बफर' क्षेत्राच्या कडक नियोजनामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासांना आणि जंगल संरक्षणाला मोठी चालना मिळाली आहे.
Impact of Human Interference on Wildlife Habitats

Impact of Human Interference on Wildlife Habitats

esakal

Updated on

लेखक- सुदर्शन कुडचे

प्रस्तावना

भारत हा जगातील सर्वात मोठ्या व्याघ्र अधिवासांपैकी एक मानला जातो. घनदाट जंगले, गवताळ प्रदेश आणि विविध परिसंस्था यांमुळे देशात वाघांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध आहे. व्याघ्र हा केवळ एक वन्य प्राणी नसून संपूर्ण जंगल परिसंस्थेच्या संतुलनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे व्याघ्रांचे संरक्षण म्हणजे जंगल, जलस्रोत आणि जैवविविधतेचे संरक्षण होय. गेल्या काही दशकांमध्ये जंगलतोड, मानवी हस्तक्षेप आणि शिकारीमुळे वाघांची संख्या कमी होण्याची चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारताने विविध कायदे, प्रकल्प आणि धोरणांच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनाला प्राधान्य दिले.

प्रोजेक्ट टायगर : संवर्धनाचा महत्त्वाचा टप्पा

भारतामध्ये व्याघ्र संवर्धनासाठी १९७३ मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वाघांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित करणे आणि त्यांच्या संख्येत वाढ करणे हा होता. सुरुवातीला काही निवडक व्याघ्र प्रकल्पांपासून सुरू झालेली ही मोहीम आज देशभर विस्तारली आहे. सध्या भारतात ५८ व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत. या प्रकल्पांमुळे जंगल संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनाला चालना मिळाली आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोर क्षेत्र आणि बफर क्षेत्र अशी विभागणी करण्यात आलेली असते. कोर क्षेत्र पूर्णपणे संरक्षित असते आणि तेथे मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असतो. बफर क्षेत्रामध्ये नियंत्रित मानवी क्रियांना परवानगी दिली जाते.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची भूमिका :

व्याघ्र संवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. हे प्राधिकरण व्याघ्र प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि मार्गदर्शन करते. व्याघ्र प्रकल्पांच्या सीमा निश्चित करणे, त्यामध्ये बदल करणे किंवा नवीन प्रकल्प जाहीर करणे यासाठी विशेष प्रक्रिया ठरवण्यात आलेली आहे. राज्य सरकारांच्या प्रस्तावानंतर राष्ट्रीय स्तरावर शिफारसी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या संस्थेमुळे देशभर व्याघ्र संवर्धनासाठी एकसमान धोरण राबवण्यास मदत झाली आहे.

Impact of Human Interference on Wildlife Habitats
Premium|Study Room: भारताच्या विमान क्षेत्रात वाढत्या अपघातांची चिंता; सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर देण्याची गरज
Loading content, please wait...

Related Stories

Wardha Tiger Sighting
international tiger day tiger mitra initiative uttar pradesh wildlife conservation
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com