

Indian Test Cricket Team Management
esakal
बरोबर एका वर्षापूर्वी न्यूझीलंड संघाने भारतात येऊन भारताला कसोटी मालिकेत ३-० पराभवाचा दणका दिला. ती मोठ्या रोगाची निशाणी होती. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापन, खेळाडू कोणाला त्यातून जाग आली नाही. आता दक्षिण आफ्रिकन संघाने दोन भलेमोठे पराभव करून मालिका २-० फरकाने जिंकली आहे.
माझा क्रिकेटप्रेमी डॉक्टर मित्र जगदीश हिरेमठ म्हणतो, की ‘कोणताही रोग अचानक येत नाही. तो तुम्हाला अगोदर लक्षणे दाखवतो, इशारा देतो. जागरूक असाल तर ते इशारे तुम्हाला बरोबर समजतात आणि तुम्ही लगेच योग्य उपाययोजना करता. जर शरीराने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे तुम्ही कानाडोळा केला तर रोग उग्र रूप धारण करून तुमची वाट लावतो. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे अगदी तसेच झाले आहे. गेले खासकरून एक वर्ष सातत्याने काही तरी मोठी गडबड होत असल्याची निशाणी क्रिकेट देत होते. बीसीसीआय, निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि खेळाडू सगळ्यांनी त्या गंभीर इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.’ ‘ऑल इज वेल’चे गाणे गाण्यात सगळे धन्यता मानत होते. बरोबर एका वर्षापूर्वी न्यूझीलंड संघाने भारतात येऊन भारताला कसोटी मालिकेत ३-० पराभवाचा दणका दिला. ती मोठ्या रोगाची निशाणी होती. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापन, खेळाडू कोणाला त्यातून जाग आली नाही आणि आता दक्षिण आफ्रिकन संघाने दोन भलेमोठे पराभव करून मालिका २-० फरकाने जिंकली आहे. हा सगळा प्रकार मला, ‘एकमेकां सहाय्य करू अवघे जाऊ खड्ड्यात’, असा वाटतो आहे.