
युगांक गोयल, कृती भार्गव
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास अहवालात संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांचा आढावा घेण्यात आला आहे आणि १७ शाश्वत विकास उद्दिष्टांवरील (एसडीजी) त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
यामध्ये दोन लाखांहून अधिक माहिती बिंदू (डेटा पॉइंट) वापरून मोजमाप करण्यात आले असून संयुक्त राष्ट्रांच्या निकषांतील बहुपक्षीय वैविध्याला विविध देशांत कसा पाठिंबा मिळतो याचे ताजे मोजमाप करण्यात आले आहे.