
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
भारत व अमेरिकेत मूळ समस्या आहे व्यापारतुटीची. ती भारताकडून आहे. शेतीचे सुरक्षाकवच कायम ठेवूनही त्यावर मार्ग काढता येईल. अमेरिकी कृषिउत्पादनांवरील आयातशुल्क कमी न करता, अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात वाढवण्याचा पर्याय विचारात घेता येईल.
भारत-अमेरिका संबंधात शेतीचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. सहमती होत नसल्याने भारतावर वाढीव आयातशुल्काची टांगती तलवार कायम आहे. भारतावर २६ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्यासाठीची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ मिळाली असून भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल अमेरिकेत वाटाघाटी करत आहेत.