Premium|India-America Trade Deal: भारतीय मौनाचे जागतिक भाषांतर !

अमेरिकेशी व्यापार करार करताना आपल्या संवेदनशील क्षेत्रांना कवच-कुंडलांसारख्या मजबूत संरक्षणाखाली ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
Beyond Markets: What the New India–US Trade Deal Signals for Global Power Balance

Beyond Markets: What the New India–US Trade Deal Signals for Global Power Balance

E sakal

Updated on

Zero Duty, Big Gains: How India Outplayed Rivals in the US Trade Game

विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांच्या सारासार विवेकशक्तीला अखेर जाग आली आणि त्यांनी बहुसंख्य भारत-उत्पादित वस्तूंवरील कररचनेत सुधारणा केल्या.

भारत आणि अमेरिका यांच्यात होऊ घातलेल्या वाणिज्य करारानुसार आता बहुसंख्य भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर केवळ १८% आणि काही निवडक उत्पादनांवर तर शून्य प्रतिशत करआकारणी होणार आहे.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीच्या अलीकडच्या टप्प्यात भारत आणि अमेरिका संबंध अनेक नागमोडी वळणांनी मार्गक्रमण करत करत एका अशा वळणावर येऊन ठेपले आहेत, जिथे परस्परांच्या हिताचे रक्षण आणि उभयपक्षी समान न्याय हे अंतिम गंतव्य आता खूप दूरचे वाटू नये. हे घडून आले यामागे भारतीय मुत्सद्यांचे वाटाघाटी करण्याचे कौशल्य तर आहेच; पण त्याचबरोबर त्यांनी दाखविलेल्या धीरोदात्तपणाला, चिकाटीला आणि संयमालाही या यशाचे श्रेय द्यायला हवे.

तथाकथित बेकायदारीतीने अमेरिकेत प्रवेश केलेल्या भारतीयांच्या परत-पाठवणीच्या पद्धतीतील अमानुषतेपासून ते ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत व पाकिस्तानात आपणच शांति-समझोता घडवून आणला’, असे शहाजोगपणे सुचविणाऱ्या ट्रम्प यांच्याबाबत भारतीय नेतृत्वाने संयमपूर्वक जे मौन पाळले त्या ‘मौनाचे भाषांतर’ अखेर वॉशिंग्टनला उमजले हेही या संदर्भात उल्लेखनीय आहे. स्व-सामर्थ्याची विनम्र जाण आणि समोरच्यांच्या मर्यादांचे लख्ख भान असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य भाषांतर होईपर्यंत देशाची मौन-नीती सुरूच ठेवली !

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com