Indian Immigrants best for US
Esakal
नवी दिल्ली: एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीयांविरोधात नवनवे फतवे काढत आहे. भारत कसा अमेरिकेवर अवलंबून आहे हे सांगणारी वक्तव्य करत आहेत. मात्र असे असतानाच आता अमेरिकेलाच मान खाली घालावे लागणारे संशोधन अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ डॅनियल डी मार्टिनो यांच्या अभ्यासानुसार, भारतीय नागरिक हे अमेरिकेसाठी सर्वाधिक आर्थिक मूल्य (Highest Economic Value) आणणारे आणि कर्जाचा बोजा कमी करणारा 'उत्कृष्ट मूळ देश गट' (Best Country of Origin Group) आहे. म्हणजेच अमेरिकेच्या आर्थिक मूल्यांत सर्वाधिक योगदान देण्यामध्ये भारतीय नागरिक आघाडीवर आहेत.
अमेरिकेत स्थलांतरितांविरुद्ध, विशेषत: भारतीय वंशाच्या लोकांविरुद्ध, वंशवादाच्या घटना आणि राजकीय टीका वाढत असताना, एका अमेरिकन अर्थतज्ज्ञाने प्रकाशित केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
मार्टिनो यांनी मॅनहॅटन इन्स्टिट्यूट थिंक टँकसाठी The Fiscal Impact of Immigration या नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे. अमेरिकेच्या सध्याच्या स्थलांतर धोरणाचे परीक्षण करून, अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या उच्च-शिक्षित स्थलांतरितांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारण्याची सूचना या अहवालात करण्यात आली आहे.