Premium|Study Room : पाच वर्षांत नऊ लाख भारतीयांनी स्वीकारले OECD देशांचे नागरिकत्व; नवा अहवालातील आकडे काय सांगतायेत.?

Indian Migration and Citizenship Trends : परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी जाणारे भारतीय आता तिथेच कायमस्वरूपी स्थायिक होत आहेत. ओईसीडीच्या आकडेवारीतून भारतीयांचे वाढते परदेशगमन आणि नागरिकत्व स्वीकारण्यामागील बदलते चित्र समोर येते.
Indian Migration and Citizenship Trends

Indian Migration and Citizenship Trends

esakal

Updated on: 

परदेशात शिक्षणासाठी जाणे, नोकरी मिळवणे आणि काही वर्षांनी मायदेशी परतणे, हे भारतीयांसाठी नवीन नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या स्थलांतराचे स्वरूप बदलताना दिसत आहे. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी गेलेले अनेक भारतीय आता तिथेच कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा आणि त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे भारतीयांचे परदेशगमन हा केवळ रोजगार किंवा शिक्षणाचा विषय राहिलेला नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी, कुशल मनुष्यबळाशी आणि भविष्यातील विकासाशी जोडला गेला आहे.
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या म्हणजेच International Migration Outlook 2026 (OECD) या अहवालातील आकडेवारी काहीशी चिंता वाढवणारी आहे. या अहवालानुसार, २०२० ते २०२४ या पाच वर्षांत सुमारे ९ लाख २५ हजार भारतीय नागरिकांनी OECD सदस्य देशांचे नागरिकत्व स्वीकारले. मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच काळात भारतीय नागरिक हे OECD देशांचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये सर्वांत मोठा गट ठरले. त्यामुळे भारतीयांच्या स्थलांतराचा आणि परदेशात स्थायिक होण्याच्या निर्णयाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

OECD च्या यादीत कोणकोणत्या देशांचा समावेश होतो?

OECD म्हणजे Organisation for Economic Co-operation and Development. ही आंतरराष्ट्रीय संघटना असून तिचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे. १४ डिसेंबर १९६० मध्ये पॅरिसमध्ये OECD च्या स्थापनेसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सुरुवातीला यात २० देश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी १९४८ मध्ये OEEC म्हणजेच Organisation for European Economic Co-operation ही संघटना स्थापन झाली होती. अमेरिकेच्या Marshall Plan अंतर्गत मिळणाऱ्या मदतीचे व्यवस्थापन करणे हे तिचे प्रमुख काम होते. पुढे तिचे रूपांतर OECD मध्ये झाले. या संघटनेत युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आशिया-पॅसिफिकमधील ३८ देशांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारत OECD चा अधिकृत सदस्य नाही. मात्र भारताला OECD चा Key Partner Country म्हणून स्थान आहे. त्यामुळे भारत OECD च्या विविध धोरणात्मक चर्चा, संशोधन आणि उपक्रमांमध्ये सहभागी होतो.

स्थलांतरात भारत आघाडीवर

OECD च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारत हा OECD देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांचा सर्वांत मोठा मूळ देश होता. त्या वर्षात सुमारे ४.९५ लाख भारतीय नव्याने OECD देशांमध्ये स्थलांतरित झाले. चीनमधून सुमारे ३.५० लाख नागरिक या देशांमध्ये गेले. मात्र भारतीयांचे स्थलांतर २०२३ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी कमी झाले. विशेषतः ब्रिटनमध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या निम्म्यावर येऊन ६६ हजारांवर पोहोचली. या आकडेवारीतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी असली, तरी प्रत्येक देशाकडे होणाऱ्या स्थलांतराचा वेग सारखा नाही. विविध देशांमधील व्हिसा नियम, रोजगाराच्या संधी, शिक्षणाचे पर्याय आणि कायमस्वरूपी वास्तव्याच्या धोरणांचा त्यावर परिणाम होत आहे.

Loading content, please wait...