

Stock Market Investment Recommendations
esakal
अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून दरकपातीची अपेक्षा आणि परदेशी निधीच्या प्रवाहाचा वाढता ओघ या आशेवर गेल्या महिन्यात जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल दिसून आला. त्याचे प्रतिबिंब आपल्याकडील शेअर बाजारातही उमटले. भारतीय शेअर बाजारांनीही तेजीची घोडदौड कायम राखत नवे उच्चांक प्रस्थापित केले. उच्चांकी पातळीवर काही प्रमाणात नफेखोरीही दिसून आली. या पार्श्वभूमीवर, वर्षअखेरीच्या या महिन्यात कोणते शेअर आकर्षक ठरतील, यावर एक नजर टाकू या.