Premium|Indian Student Protest: हिंसेऐवजी ' कलेक्टीव्ह स्ट्रॅटेजिक ह्युमर'; तणावाचे रूपांतर सर्जनशीलतेत करणाऱ्या 'जेन झीं' नी का जिंकली लोकांची मनं..?

Gen Z Protest: फ्रॉइडच्या सब्लिमेशनपासून CBT पर्यंतच्या मानसशास्त्रीय संकल्पनांचा वापर करत, दिल्लीतील विद्यार्थ्यांनी रील्स, घोषणां, पोलिसांशी मानवी संवाद आणि अफिलिएटिव्ह ह्युमरद्वारे तणावाला सामूहिक सर्जनशील ऊर्जेत बदललं
Gen Z Protest

Gen Z Protest

Esakal

Updated on

पुणे – मराठीत एक म्हण आहे... ‘अति झालं आणि हसू आलं’. सध्याच्या विद्यार्थी आंदोलनात ज्या पद्धतीने मुलांना मारलं, आंदोलनस्थळाचं इंटरनेट बंद केलं, मुलांवर गुन्हे दाखल केले. हे सगळं खरं तर संताप यावा असंच होतं पण या संतापाचा त्रास करून घेण्याऐवजी त्याला सर्वांनी मिळून एका क्रिएटिव्ह ह्युमरमध्ये याचं रूपांतर केलं. जनरेशन झेड ने दाखवून दिलं की.. प्रत्येकवेळी संघर्ष हा रडून करायचा नसतो तर तो मिळून करायचा असतो.

मानसशास्त्रीयदृष्ट्या हे आंदोलन एक महत्त्वाचा बदल अधोरेखित करते आहे. आजची Gen Z पिढी राग दडपून ठेवत नाही, पण तो हिंसेतही बदलत नाही. ती भावनिक बुद्धिमत्ता, डिजिटल स्किल आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांच्या जोरावर मोठी सामूहिक कृती घडवते. म्हणूनच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन हे केवळ राजकीय आंदोलन नव्हते; ते आधुनिक Gen Z च्या संवादशैलीचे, psychological resilience आणि लोकशाही सहभागाच्या नव्या पद्धतीचे प्रतिक होते.

आपला राग हा सर्जनशील कृतीततून व्यक्त करता येतो असं मानसशास्त्र सांगतं... प्रत्येक वाईट घटना जशी फक्त आपल्याला फक्त दु:खच देते असे नसते. तर ती आपल्याला जगण्याचं शास्त्र शिकवत असते. म्हणूनच मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून या आंदोलनाच्या यश तपासून पहाण्याचा प्रयत्न या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूया..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com