Premium|Priyadarshan Sahasrabuddhe Biogas Innovation : जागतिक युद्धाची झळ स्वयंपाकघराला बसण्यापूर्वीच पुणेकर अभियंत्याने शोधला ‘एलपीजी मुक्त’ गॅसचा पर्याय!

Pune sustainable energy : युद्धामुळे डळमळणाऱ्या इंधनपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी घरगुती ओल्या कचऱ्यावर चालणाऱ्या ‘वायू’ बायोगॅसद्वारे एलपीजीमुक्त, शाश्वत आणि सुरक्षित जीवनशैलीचा पर्याय उभा केला
Priyadarshan Sahasrabuddhe Biogas Innovation

Priyadarshan Sahasrabuddhe Biogas Innovation

esakal

Updated on

प्रसाद घारे - prasad.ghare@gmail.com

हजारो किलोमीटर दूर सुरू झालेल्या युद्धाची झळ ही आपल्या घरातील चुलीपर्यंत पोहोचत असेल तर ऊर्जा व्यवस्थेच्या आपल्या पद्धतीत काहीतरी मूलभूत चूक आहे, हे मान्य करावे लागेल. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीसारख्या पारंपरिक इंधनांवर अवलंबून असलेली आपली जीवनशैली किती असुरक्षित आहे, याची जाणीव अशा संकटांच्या काळात प्रकर्षाने होते. मात्र, याच पार्श्वभूमीवर पुण्यातील अभियंता प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करून ‘एलपीजी मुक्त’ जीवनशैलीचा पर्याय प्रत्यक्षात साकारला आहे, तोही शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मार्गाने. त्यांची ही अनोखी यशोगाथा...

गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या इराण-इस्राईल-अमेरिका युद्धामुळे या देशांपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्या देशासारख्या अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. या सातासमुद्रापार असलेल्या देशांमधील संघर्षामुळे माझ्या घरातील चूल पेटायची थांबणार असेल तर काहीतरी मुळातच चुकत आहे, याची जाणीव आपल्याला झाली आहे का? पृथ्वीच्या पोटात दडलेल्या इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल, गॅस आदी) जिवावर जगभरात उभे राहिलेले हे कृत्रिम इमले अजून किती काळ टिकणार आहेत? या प्रश्नाने आपण कधी अस्वस्थ झालो आहोत का? याचे खरे उत्तर, ‘नाही’ असेच असेल. याचे कारण याच इंधनाच्या जिवावर उभ्या असणाऱ्या कृत्रिम विश्वाचे आपण अविभाज्य भाग आहोत. यातून ठरवून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ आली आहे, हे मात्र खरे. या युद्धामुळे आपल्या घरातील चूल विझायच्या आत आपण भानावर येतो का, हा खरा प्रश्न आहे. प्रियदर्शन सहस्रबुद्धे या अस्सल पुणेकराने आपल्या घरातील चूल तर विझणार नाहीच आणि त्याचबरोबर आपण ‘एलपीजी’, ‘पीएनजी’ मुक्त होऊ शकतो, हे प्रत्यक्ष वापरातून दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com