
एम. एन. एस. कुमार
हैदराबादमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटर’प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. ‘आयव्हीएफ’, ‘सरोगसी’ आणि अर्भक विक्री या सर्वांचा संगनमताने गैरवापर करून महिलांचे शोषण, अवैध व्यवहार आणि कायद्याचे उल्लंघन कशा प्रकारे होत होते याचे हे ठळक उदाहरण आहे. ‘नवआयुष्य देणारे वैद्यकीय तंत्र’ म्हणून ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रतिष्ठा होती, त्या तंत्राचा वापर नफेखोरी अन् काळ्या पैशासाठी केला गेला. तेलंगणमधील या धक्कादायक प्रकरणाविषयी...
हैदराबादमध्ये ‘युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटर’ हे क्लिनिक अधिकृत परवान्याशिवाय चालवले जात होते. त्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले. या केंद्राच्या संचालिका डॉ. अत्तलुरी नम्रता यांनी ‘आयव्हीएफ’ आणि सरोगसीच्या बहाण्याखाली अर्भक विक्री आणि तस्करीचे अवैध ‘रॅकेट’ चालवून करोडो रुपये कमावले.