Premium|IPL 2026 Analysis : आयपीएल २०२६ मध्ये गोलंदाजच ठरवणार विजेतेपदाचे भवितव्य; बुमरापासून चहल-अक्षरपर्यंत सर्वांच्या माऱ्यावर लक्ष

Tata IPL 2026 match predictions and bowling impact : टाटा आयपीएल २०२६: फलंदाजांच्या राज्यात गोलंदाज ठरणार गेमचेंजर; बुमराच्या प्रेरणेने गोलंदाजीची धार वाढणार असून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार, तर दुखापती आणि खेळाडूंच्या माघारीचा संघांना फटका.
Tata IPL 2026 match predictions and bowling impact

Tata IPL 2026 match predictions and bowling impact

esakal

Updated on

सुनंदन लेले-sdlele3@gmail.com

बघायला गेले तर २४ चेंडू म्हणजे चार षटकाच्या माऱ्यात गोलंदाजाने काय करामत केली ते सामना संपल्यावर जास्त जाणवते. कालपासून चालू झालेल्या टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेत कोणते संघ प्रगती करणार, याचे भवितव्य फलंदाजांपेक्षा गोलंदाज ठरवणार, असे मला तरी वाटते.

छोट्या सीमारेषा, नवे चेंडू, क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आणि फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या या सगळ्याचा अंतर्भाव असल्याने बऱ्याच लोकांचा असा समज आहे, की टी-२० क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजांचे राज्य. बहुतांशी सामने बघताना असे वाटते, की गोलंदाजांना मार खाण्याचे पैसे मिळतात. विचार अगदीच चुकीचा आहे, असे अजिबात नाही. तरीही जितके सामने जवळून अभ्यासता येतात तेव्हा समजते, की सामन्याच्या दोऱ्या गोलंदाजांच्या हाती असतात. फलंदाजांचे चौकार-षटकार किंवा शतके अर्धशतके नजरेत भरतात तसे गोलंदाजांचे मोल आकडेवारी बघून कळत नाही. त्यासाठी जरा जास्त खोलात जाऊन बघावे लागते. गोलंदाजाने मोक्याच्या क्षणी जम बसलेल्या फलंदाजाला बाद केले तर नाट्यमय कलाटणी मिळते किंवा एका षटकात अचूक मारा केल्याने जास्त धावा दिल्या जात नाहीत, ज्याने धावगती आणि परिणामाने फलंदाजांवरचे दडपण अचानक वाढते. तेव्हा कुठे विचार करता गोलंदाजाचे महत्त्व कळते. बघायला गेले तर २४ चेंडू म्हणजे चार षटकांच्या माऱ्यात गोलंदाजाने काय करामत केली ते सामना संपल्यावर जास्त जाणवते. कालपासून चालू झालेल्या टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेत कोणते संघ प्रगती करणार, याचे भवितव्य फलंदाजांपेक्षा गोलंदाज ठरवणार, असे मला तरी वाटते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com